Pune News : पुणे : पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षी राज्यभर गाजलेल्या रुबी हॉस्पिटमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांचाही समावेश असेल.
तीन महिन्यात समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित
मागील वर्षी सारिका सुतार या महिलेला पैशांचे आमिष दाखवून २४ मार्च २०२२ रोजी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यासाठी तिच्याकडून ज्याने किडनी घेतली (Pune News) त्या आरोपीने बनावट कागदपत्रे प्रत्यारोपण समितीकडे सादर करून परवानगी घेतली होती. सुतार यांना पैसे न मिळाल्याने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अवैध किडनी प्रत्यारोपणाबाबत संबंधित रुबी हॉल क्लिनिकचा सहभाग आहे का याची चौकशी सुरू होती.
दरम्यान, नियुक्त करण्यात आलेली समिती सर्व आरोपांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. चौकशीदरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी करायच्या उपाययोजनांची शिफारसही समितीकडून केली जाणार आहे. (Pune News) संबधितांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारसही समिती करणार असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजनाही समिती सुचवणार आहे. या समितीला चौकशीसाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
पुण्याचे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, वैद्यकीय शिक्षण व संशोधन माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, बॉम्बे हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रीरंग बच्चू, ग्लोबल हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भरत शाह, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अरुण तिरलापूर, (Pune News) क्रिटिकेअर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. वत्सला त्रिवेदी, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा विभागाचे आरोग्य सेवा सहायक संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालयातील विधी सल्लागार भाग्यश्री रंगारी तसेच या समितीचे सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्याच्या दुर्गम भागातील ३५५ शाळा दोन दिवस बंद ठेवणार
Pune News : तुम्हालाही भारत सरकारचा मेसेज आला का? घाबरू नका, जाणून घ्या कारण..