Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘आयटी’ हब नंतर आता पुणे होणार ‘ईव्ही’ हब… मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ; जाणून घ्या प्रकल्पासाठीची गुंतवणूक..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 June 2023, 15:14

Pune News : पुणे : विद्येचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे. कालांतराने पणे आयटी हब म्हणून विकसित होत गेले. आता पुणे आणखी एका कारणासाठी ओळखले जाणार आहे. पुण्यात येत्या काळात इलेक्ट्रीक व्हेईकल (ईव्ही), बॅटरी, आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या साडेतरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना बुधवारी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पांमुळे पुण्यात ‘ईव्ही’ करण्याबरोबरच ‘बॅटरी स्वॅपिंग स्टेशन’ची निर्मितीही केली जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे भविष्यात पुणे शहराला ‘ईव्ही’ अर्थात इलेक्ट्रीक व्हेईकल हब असे आणखी एक विशेषण लागू होणार आहे. मुंबईमध्ये बुधवारी राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे या बैठकीला उपस्थित होते. (Pune News)

दरम्यान, या बैठकीत झालेल्या चर्चेअंती पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे उभारल्या जाणाऱ्या ‘ईव्ही’ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स, गोगोरा इंडिया, एथर एनर्जी अशा तीन कंपन्या पहिल्या टप्प्यामध्ये १३ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणूकीद्वारे हजारो रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती उद्योग विभागाकडून देण्यात आली. (Pune News)

 

कशी होणार गुंतवणूक

– ‘गोगोरा’प्रमाणेच ‘पिनॅकल मोबिलिटी’तर्फे उभारला जाणारा प्रकल्प व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देणार आहे.
– या प्रकल्पात इलेक्ट्रिक बस, ट्रक, कंटेनर अशा वाहनांच्या निर्मितीसह अद्ययावत इलेक्ट्रिक वाहननिर्मिती सुविधा या प्रकल्पाद्वारे उपलब्ध करण्यात येणार आहे.
– हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहन निर्मितीची सुविधाही या प्रकल्पात विकसित केली जाईल.
– या प्रकल्पाद्वारे भविष्यात १२ हजार ‘बॅटरी स्वॅपिंग स्टेशन’ तयार करणार. त्यातून महाराष्ट्रात ‘बॅटरी स्वॅपिंग’चे जाळे निर्माण करण्यात येणार आहे.
– गोगोरा इंडिया या कंपनीचे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांमध्ये प्रकल्प.
– देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा प्रकल्प पुण्यात असणार आहे.
– ‘गोगोरा’कडून ईव्ही आणि बॅटरी निर्मितीही करण्यात येणार आहे.

* कसा असेल पुण्यातील ‘ईव्ही’ प्रकल्प

– पुण्यात इलेक्ट्रॉनिक पार्क होणार असल्याने ‘ईव्ही’साठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक उत्पादनही होणार
– टाटा समूहाच्या ‘ईव्ही’ निर्मितीच्या प्रकल्पालाही मान्यता.
– बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या जाळ्यामुळे ‘ईव्ही’च्या वापरामध्ये पुणे परिसरात वाढ होईल.
– ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या ईव्ही क्षेत्रातील १० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता.
– आता गोगोरा आणि पिनॅकल मोबिलिटी या दोन कंपन्यांच्या प्रकल्पांना मान्यता.

बॅटरी स्वॅपिंग स्टेशनमुळे भविष्यात बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही. स्टेशनवर जाऊन बॅटरीची अदलाबदली होईल. अशा सुविधांमुळे ‘ईव्ही’ क्षेत्रात पुणे आणि महाराष्ट्र देशात सर्वांत आधी प्रगती साधेल, अशी प्रतिक्रीया उद्योग विभागाचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केली. (Pune News)

दरम्यान, उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या गुंतवणुकीत नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा. हा प्रकल्प २१ एकर जागेवर उभारणार असून, एक हजार ३५४ औद्योगिक आणि व्यापारी आस्थापना याठिकाणी सुरू होतील. येथे रत्ने आणि आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्याची योजना आहे.नंदुरबार, नगर आणि सातारा येथेही गुंतवणुकीचे निर्णय या वेळी घेण्यात आले. (Pune News)

छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रील व्हेइकल्स आणि बॅटरीचीनिर्मिती करणाऱ्या इथर एनर्जी कंपनीद्वारे ८६५ कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. पुणे येथे देशातील पहिल्या ई-बस निर्मितीच्या ७७६ कोटी गुंतवणूकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. पुणे येथे पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स या घटकाकडून भारतातील तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत व्यावसायिक इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधन-सेल वाहन निर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहे. (Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : माजी सैनिकांना नोकरीची संधी ; 'या' विभागात २४९ पदांची भरती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.