Pune News : पुणे: भारतात होणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपमधील पाच लढती आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए)मिळाला आहे. या लढती पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत. यामुळे पुण्यात तब्बल २७ वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कपच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. पुण्यात वनडे वर्ल्ड कपची अखेरची लढत १९९६ला नेहरू स्टेडियमवर झाली होती. २९ फेब्रुवारी १९९६ला झालेल्या लढतीत केनयाने वेस्ट इंडिजला ७३ धावांनी पराभूत केले होते.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे सांगितले. (Pune News) भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यांशिवाय इतर चार सामने पुण्यात होतील.
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचे आभारी आहोत. (Pune News) पुण्यात प्रत्येक लढतीला मोठा प्रतिसाद मिळतो. मग लढत आयपीएलची असो, की महाराष्ट्र प्रीमियर लीगची. एमपीएल संपल्यानंतर लगेचच आम्ही पार्किंग, तिकीट काउंटरसह इतर आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करणार आहोत. ही कामे सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून मैदान स्पर्धेसाठी सज्ज ठेवणार आहोत.’
पुण्यात होणाऱ्या लढती
१९ ऑक्टोबर- भारत वि. बांगलादेश – दु. २ पासून
३० ऑक्टोबर- अफगाणिस्तान वि. पात्र संघ – दु. २ पासून
१ नोव्हेंबर- न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका – दु. २ पासून
८ नोव्हेंबर- इंग्लंड वि. पात्र संघ – दु. २ पासून
१२ नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश – स. १०.३० पासून
मुंबईतील वर्ल्ड कप लढती
२१ ऑक्टोबर- इंग्लंड वि. द. आफ्रिका, दु. २ पासून
२४ ऑक्टोबर- बांगलादेश वि. द. आफ्रिका, दु. २ पासून
२ नोव्हेंबर- भारत वि. पात्र संघ २, दु. २ पासून
७ नोव्हेंबर- अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, दु. २ पासून
१५ नोव्हेंबर- पहिली उपांत्य लढत, दु. २ पासून
विरोधकांची टीका
वर्ल्ड कपच्या कार्यक्रमात अहमदाबादला झुकते माप देण्यात आल्याचे सांगत काही विरोधी पक्षनेत्यांनी टीकेचा सूर लावला आहे. (Pune News) अहमदाबादला महत्त्वाच्या लढती मिळाल्या असून नागपूर, मोहाली, इंदूर, राजकोट, रांची या इतर महत्त्वाच्या ठिकाणी वर्ल्ड कप सामनेच नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, पंजाबचे क्रीडामंत्री गुरमीतसिंग यांनी हा टीकेचा सूर आळवला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांनो काळजी घ्या ! सिंहगड घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला