Pune News : पुणे : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा क्रांती मोर्चावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारच्या घटनेनंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुण्यातून जाणाऱ्या ६०० पेक्षा अधिक बस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकसान होऊ नये म्हणून बससेवा बंद
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज दुसऱ्या दिवशी देखील राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. (Pune News) तर गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी एसटी बसची तोडफोड करण्यात आली असून, गाड्यांची जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि एसटी बस यांचे होणारे नुकसान पाहता पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या ६०० हून अधिक बसेस थांवण्यात आल्या आहेत.
पुण्यातून रविवारी (ता.०३) सकाळपासून सोलापूर, जालना, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, अवसाकडे जाणारी एकही बस पुण्यातून सुटलेली नाही. (Pune News) रोज तेरा ते पंधरा हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जाळपोळ होऊ नये याची काळजी घेत या बस पुण्यातच थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं बघायला मिळत आहे.
दरम्यान, रविवार सुट्टी असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावर गावाकडे जाण्यासाठी निघाले असताना, बस नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.(Pune News) विशेष म्हणजे काही प्रवासी कालपासून गावाकडे येण्यासाठी बस स्थानकावर चकरा मारत आहे. तसेच या बस पुन्हा कधी सुरु होणार याबाबत अजुन कोणतेही अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून मिळत नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हडपसर येथील २४ वर्षीय तरुणाचा भाटघर धरणात बुडून मृत्यू
Pune News : अखेर गौतमी पाटील धावली वडिलांच्या मदतीला ; पुण्यात वडिलांवर होणार उपचार
Pune News : …अखेर तोतया लष्कर अधिकाऱ्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी पकडले