Pune News : पुणे : आजकालचे तरुण शेती करत नाहीत, अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक चित्र दिसत आहे. आजकालचे अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळत आहेत. एवढेच नव्हे तर सेंद्रिय शेती करण्याकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील वेळू गावाचे प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांनी दोन एकर शेताच्या बांधावर शेवग्याची लागवड केली आहे. दोन एकर क्षेत्रावरील शेतीच्या बांधावर शेवग्याची ७० झाडे लावत सेंद्रिय पद्धतीने शेती केली आहे. झाडाला सध्या साडेचार फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा लगडल्या आहेत. शेंगांच्या लांबीमुळे शेतकरी घुले चर्चेत आले आहेत.
भोरच्या शेतकऱ्याने केली कमाल!
घुले यांनी लावलेल्या सेंद्रिय शेंगा चवीला स्वादिष्ट, लांबीला साधारण साडेचार फूट, पातळ साल, हिरवा रंग असणार्या या शेंगांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. (Pune News) प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले आणि प्रसाद गुलाब घुले यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक शेती करत आपली शेती विषमुक्त केली आहे.
कोंढव्यामध्ये विषमुक्त नैसर्गिक शेतीच्या दहा दिवसीय शिबिरात घुले हे सहभागी झाले होते. २०१५ मध्ये सुभाष पाळेकर यांनी यातून प्रेरणा घेत देशी गाईच्या आधारे विषमुक्त नैसर्गिक शेती केली. तीन एकर शेती ही पारंपारिकतेला फाटा देत अत्याधुनिकतेवर भर दिला. (Pune News) कमी पाण्यावर तीन एकरात उत्तम आणि दर्जेदार मिश्र पद्धतीने पीक घेत नैसर्गिक शेती करताना प्रगतिशील होण्यापेक्षा प्रयोगशीलतेवर गुलाब घुले यांनी भर दिला. बांधाच्या दोन्ही बाजूंनी आंबा, नारळ, पेरू, शेवगा अशा फळझाडांची लागवड त्यांनी केली आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यापासून संरक्षण मिळते.
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन ते नैसर्गिक विषमुक्त शेतीकडे वळले. या शेतीतून मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे ही सात्विक निरोगी उच्च प्रतीची असल्याने कायमस्वरूपी स्थिर बाजारपेठ उपलब्ध झाली. (Pune News) निश्चित हमी भाव मिळाला आणि सर्व उत्पादनाची ऑनलाईन विक्री होत आहे, अशी माहिती गुलाब घुले यांनी दिली आहे.
शेतावर नवीन केलेल्या प्रयोग उत्पादनामुळे शेती पाहण्यासाठी इतर देशांवरूनही लोक घुलेंच्या शेतात येतात. साडेचार फूट तीन इंचाच्या शेवगा शेंगेची पूर्वी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंद झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पारदर्शक निकालासाठी ईव्हीएमचे आधुनिकीकरण व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस
Pune News : लवासात उभारणार पंतप्रधान मोदींचा जगातील सर्वांत उंच पुतळा? एवढी असेल उंची…