Pune News : पुणे : सध्या सायबर गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढली आहे. ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. असाच एक आर्थिक फसवणुकीचा प्रकार तरुणीच्या बाबतीत घडला आहे. क्रेडीट कार्डच्या व्यवहाराची मर्यादा वाढविण्याच्या आमिषाने तरुणीची आठ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने तक्रारदार तरुणीच्या मोबाईलवर फोन केला. एका खासगी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. (Pune News) क्रेडीट लिमिट वाढविण्यात येणार असल्याचे सांगत त्याने तरुणीचा पॅनकार्ड तसेच बँक खाते क्रमांक घेतला. याच माहितीचा गैरवापर करत त्याने तरुणीच्या नावावर कर्ज घेतले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकेचे केले सेक्सटॉर्शन
Pune News : ‘रिपाइं’च्या शहराध्यक्षपदासाठी चुरस; रिपाइंमध्येही भाकरी फिरणार ??