Pune News : पुणे : भूगाव ते चांदणी चौक आणि तेथून पुन्हा भूगावपर्यंत धावण्याचा सराव करीत असताना, धावता धावता अचानक चक्कर येऊन आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू
भूगाव परिसरातील घटना
झाल्याची धक्कादायक घटना भूगाव (ता. मुळशी) येथे बुधवारी (ता.१६) घडली आहे. या दुर्देवी घटनेमुळे भूगावसह मुळशी तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
हर्षद चंद्रशेखर पिंगळे (वय ३९, रा. स्काय मानस लेक, भुकूम, ता. मुळशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हर्षद यांचा भाऊ राजस चंद्रशेखर पिंगळे (वय ३४, रा. बिबवेवाडी) यांनी पौड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद पिंगळे हा तरुण भूगाव परिसरात राहतो. हर्षद हा भूगाव ते चांदणी चौक आणि तेथून पुन्हा भूगावपर्यंत धावण्याचा सराव करीत होता. (Pune News) नेहमीप्रमाणे हर्षद सराव करून भूगावला आला. तेव्हा धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला.
दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका टेंपोचालकाने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी उपचारापुर्वीच हर्षद पिंगळे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.(Pune News) तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पौंड पोलिस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बेकायदा सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या ; किरकिटवाडी परिसरातील घटना..
Pune News : रक्षाबंधनानिमित्त विशेष राखी लिफाफे पोस्ट ऑफिसमध्ये अल्प दरात उपलब्ध…