Pune News : पुणे : बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने तिघांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी महिलेला मंगळवारी अटक केली. (A woman who cheated three people on the pretext of an interest-free loan was put in shackles)
मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सकीना तायर पुनावाला (वय 32, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. (Pune News) याबाबत अंकुश दंडाप्पा बजलोर (वय 40, रा. आंबेडकर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकीना पुनावाला ही फिर्यादी अंकुश बजलोर यांच्या घरी गेली. तिने आपण अदर पुनावाला यांच्या सेवाभावी संस्थेची कार्यकर्ता असून, (Pune News) या संस्थेकडून पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष फिर्यादीला दाखविले.
सकीना पुनावाला हिने फिर्यादी कडून 17 हजार रूपये, इरफान शेख यांच्याकडून 25 हजार रूपये आणि एका महिलेकडून 17 हजार रूपये घेतले. (Pune News) सकीनाने तिघांना बँकेचा बनावट धनादेश देवून 59 हजार रूपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच..
Pune News : विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास हीच आमच्या यशाची खरी गुरुकिल्ली , ह.भ.प. खरमाळे महाराज