Pune News : पुणे : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चंद्राचे आकर्षण असते. १ ऑगस्टच्या मध्यरात्री व २ ऑगस्टला पहाटे आकाशात ‘सुपरमून’ अधिक मोठ्या प्रमाणात व चमकदार अशा स्थितीत असताना त्याचे हे आगळे-वेगळे स्वरूप दिसणार आहे. आकाराने मोठ्या आणि आकर्षक दिसणाऱ्या चंद्राला बक मून किंवा सुपरमून म्हटले जाते. पृथ्वी आणि चंद्र यातील सरासरी अंतर हे साधारणपणे ३,८२,५०० किलोमीटर असते. मात्र, आजच्या दिवशी ते अंतर कमी होणार आहे. या अनोख्या बक मूनचे साक्षीदार अनेक खगोलप्रेमींना होता येणार आहे.
खगोलप्रेमींना पर्वणी
चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५७ हजार किलोमीटर अंतरावर असल्याने चंद्रबिंब आकाराने मोठे व अधिक प्रकाशित दिसेल. पृथ्वीच्या जवळ येणारा चंद्र सुपरमून म्हणून ओळखला जातो. (Pune News) आपला चंद्र पृथ्वीला सर्वात जवळ असल्याने आकाशात तो सर्वाधिक वेगाने अर्थात १२ अंश पूर्वेकडे सरकतो. प्रत्यक्षात मात्र चंद्र पश्चिमेस जाताना वाटतो. याचे कारण पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
सर्व जगात बहुमान प्राप्त करणाऱ्या भारताच्या चंद्रयानाने पृथ्वीची कक्षा ओलांडून नुकताच चंद्र कक्षेत प्रवेश केला आहे. (Pune News) चंद्र आणि चंद्र कक्षेत दाखल झालेले चंद्रयान ३ असा अनोखा संगम आकाश प्रेमींना एक अनोखी आकाशभेट असणार आहे. हा अनोखा आकाश नजारा अवश्य पहावा, असे आवाहन दोड यांनी केले आहे.
सूपरमून तुम्ही उघड्या डोळ्यांनीही पाहू शकता. त्यासाठी चष्मा वगैरे घालण्याची गरज नाही. पण तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे चंद्रामधला बदल अनुभवायचा असेल, तर तुम्ही दुर्बिणीनेही पाहू शकता.
२०२३ मध्ये या दिवशी पाहायला मिळेल पूर्ण चंद्र
– १ ऑगस्ट: स्टर्जन मून
– ३० ऑगस्ट: ब्लू मून
– २९ सप्टेंबर: हार्वेस्ट मून
– २८ ऑक्टोबर: हंटर मून
– २७ नोव्हेंबर: बीव्हर मून
– २६ डिसेंबर: कोल्ड मून
यावर्षी अपेक्षित असलेल्या नऊ उल्कावर्षावांपैकी काही भागात संध्याकाळपासून पहाटेपर्यंत सर्वाधिक उल्कावर्षाव या दरम्यान होतील.
– दक्षिणी डेल्टा एक्वेरीड्स: जुलै ३०-३१
– अल्फा कॅप्रिकॉर्निड्स: जुलै ३०-३१
– पर्सीड : १२-१३ ऑगस्ट
– ओरिऑनीड : ऑक्टोबर २०-२१
– दक्षिणी टॉरीड : नोव्हेंबर ४-५
– नॉर्दर्न टॉरिड्स: नोव्हेंबर ११-१२
– लिओनिड्स: नोव्हेंबर १७-१८
– जेमिनीड: डिसेंबर १३-१४
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे महापालिकेचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे मिळकतकर भरण्यास नागरिकांना अडचणी;