गणेश नारंग
Pune News : पुणे: सध्या लग्नसराईत खूप ठिकाणी वेळेवर लग्न लागत नाही हा अनुभव आपल्या सर्वांना येतो मुहूर्ताची वेळ बघून नातेवाईक व मित्रपरिवार लग्नाला येत असतात, मात्र खूप ठिकाणी लग्न खूप उशिरा लागलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळ्यांची गैरसोय होत आहे. (A unique initiative of “Sunny’s World”! A cash prize of Rs 25,555 if the marriage is arranged at the time of Muhurta)
अनेकदा महत्त्वाचे पाहुणे वेळेत आले नाहीत म्हणून मुहूर्त लांबतो तर मग कधी वरात वेळेवर येत नाही म्हणून एक तास तर कधी दोन तास उशिराने लग्न लागते. (Pune News) त्यामुळे कार्यालयात कार्यरत असलेल्या तसेच वेळेत लग्नाला पोहोचलेल्या मित्रपरिवार पाहुणेरावळे यांचे देखील गैरसोय होते.
लग्न मुहूर्ताच्या वेळेतच लागावे म्हणून उपक्रम
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुण्याच्या सुस रोडवरील “सनीज वर्ल्ड” मध्ये लग्न मुहूर्ताच्या वेळेत लागावी म्हणून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. मुहूर्त वेळत लग्न लावल्यास रोख रक्कम २५,५५५ चे बक्षीस जाहीर केले आहे. (Pune News)
दरम्यान, मुहूर्ताचे पवित्र आणि उपस्थित पाहुण्यांचा व मित्रपरिवारचा वेळेचा सन्मान म्हणून ही योजना सनीज वर्ल्ड तर्फे राबविण्यात येत आहे असे सनी विनायक निम्हण यांनी सांगितले.(Pune News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! पुण्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..
Pune News : परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन