Pune News : पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक बंद असेल. द्रुतगती मार्गावर रविवारी (ता. २३) रात्री सव्वा दहाच्या सुमारास दरड कोसळली. साडेचार तासांच्या प्रयत्नानंतर दरड हटवण्यात यश आले. त्यानंतर मुंबईच्या दिशेने दोन लेनवर वाहतूक सुरू करण्यात आली. तर तिसऱ्या लेनवर दरड असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र, धोकादायक दरड पुन्हा कोसळू शकते. महामार्गावरही छोट्या छोट्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर दरड काढण्यासाठी आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावर वळवण्यात येणार आहे.
वाहतूकीचा वेग मंदावला
गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी खंडाळा घाटात दरड कोसळली तसेच महामार्गावरही छोट्या छोट्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. (Pune News) दरडी हटविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पुणे मुंबई महामार्गावर रविवारी दोन ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक मंद गतीने सुरू होती.
महामार्गावरील एक लेन अद्याप बंद
लोणावळा आणि अडोशी अशा दोन ठिकाणी दरड कोसळली. सध्या दरड हटविण्यात आलेली असली तरी एक लेन अद्याप बंद आहे.या लेनवर राडारोडा कायम आहे. त्यावरून वाहने घसरू शकतात. (Pune News) दुसरी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते. त्यामुळे ही लेन लेन बंद ठेवली आहे. त्याच कारणास्तव एमएसआरडीसीने दोन तासांसाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादरम्यान दरड हटविण्यात येतील.
वाहतुकीत होणारे बदल
पुण्याहून मुंबईकडे जाताना चिवळे पॉइंट येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात येईल. याच मार्गावरुन चार चाकी, हलकी, मध्यम, अवजड स्वरुपाची वाहने जातील. १२ ते २ यादरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, (Pune News) अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गोळीबार करत तंबाखू व्यापाऱ्याची लूट; ‘आई’ नावामुळे लागला गुन्हेगाराचा छडा!
Pune News : गोळीबार करत तंबाखू व्यापाऱ्याची लूट; ‘आई’ नावामुळे लागला गुन्हेगाराचा छडा!