Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या बडोदा (राय गुजरात) येथील पर्यटकाचा जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे शनिवारी (ता. २३) रात्री पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. संजय बालमुकुंद केडिया (वय- ४२, रा. ए. ७०१, सेलिब्रिटी लक्झरीया मोटरचे मागे, सनफर्मा रोड, बडोदा, गुजरात) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
जुन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आणि प्रकाश हे दोघे पुणे जिल्ह्यात पर्यनाटनासाठी आले होत. नाणेघाट येथे फिरण्यासाठी गेले असता, त्यांनी एका रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. (Pune News) दरम्यान, रिसॉर्टच्या मागे ओढा वाहत होता. आंघोळ करण्यासाठी ते ओढ्याच्या पाण्यात उतरले. दरम्यान, पाणी खोल असल्याचा अंदाज न आल्याने संजय पाण्यात बुडाले. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत प्रकाश नरोत्तमल बैगानी (रा. कल्पतरु हार्मनी, वाकड, पुणे) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (Pune News) या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता ‘समूह शाळेत’ होणार
Pune News : वाबळेवाडी शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक वारे गुरूजी अखेर दोषमुक्त! चौकशी समितीचा अहवाल