Pune Trekker Death : : पुणे : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरकडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपळे नीलख येथील एका ५७ वर्षीय व्यक्तीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
गुप्त भीमाशंकर येथे आला हृदयविकाराचा झटका
रमेश भगवान पाटील (वय- ५७, रा. पिंपळे निलख, पिंपरी -चिंचवड) असे मृत झालेल्या ट्रेकरचे नाव आहे. पुण्यात राहणाऱ्या आनंद सुभाष साळगावकर यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, साळगावकर हे वकील व्यवसाय करतात. त्यांना गड आणि किल्ले फिरण्याचा छंद आहे. त्यांनी रमेश पाटील यांच्यासह दिनेश बोडके, मंजीत चव्हाण, प्रवीण पवार, संदीप लोहकर, (Pune Trekker Death) सुनील गुरव व इतर तीन जणांनी मिळून पुणे ते भीमाशंकर असे २५ किलोमीटरचे पायी ट्रेकिंग आयोजित केले होते.
रविवारी सकाळी पहाटे पावणे सात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथून त्यांनी पायी चालायला सुरुवात केली. पायी चालत भीमाशंकरकडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे दुपारी अडीच वाजता खेड तालुक्याच्या हद्दीत रमेश पाटील हे अचानक चक्कर येऊन खाली पडले. (Pune Trekker Death) यावेळी सर्वांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांची काही हालचाल होत नव्हती व श्वास बंद पडला होता. त्यांना तोंडाने ही कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. परंतु काही फरक पडला नाही.
त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला कॉल दिला. मात्र त्यांच्याकडून लवकर प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सर्वांनी उचलून रमेश पाटील यांना भीमाशंकर मंदिराजवळ आणले. (Pune Trekker Death) घटनेची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ त्यांना तळेघर येथे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र व्यक्तीकडून कोणत्याही प्रसाद मिळत नसून त्यांना पुढे घोडेगाव येथे हलवा असे येथील डॉक्टरानी सांगितले.
दरम्यान, तेथून रुग्णवाहिकेने घोडेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. (Pune Trekker Death) या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली असता रमेश पाटील यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.