Pune News : पुणे : शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. एका तरुणीने अल्पवयीन मुलाला जाळ्यात ओढून, माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तू माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे देईन, अशी धमकी देत मुलावर त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल
संबंधित अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका २८ वर्षीय तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि तरुणी दोघे शेजारी राहण्यास आहेत. तरुणीने मुलाला जाळ्यात ओढून माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तू माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे देईल, (Pune News) अशी धमकी अल्पवयीन मुलाला दिली होती. त्यानंतर तरुणीने वेळोवेळी अल्पवयीन मुलाला धमकावले आणि जबरदस्तीने त्याच्याशी संबंध जोडले. ही तरुणी एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास संबंधित अल्पवयीन मुलाला भाग पाडले.
दरम्यान, तरुणीच्या सततच्या धमक्यांमुळे अल्पवयीन मुलगा त्रस्त झाला होता. (Pune News) अखेर त्रासाला कंटाळून त्याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाबर करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : येरवड्यात तरुणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News : आवक वाढल्याने टोमॅटो झाले स्वस्त; फळभाज्या, कांद्याच्या दरातही घट!
Pune News : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी डॉ. सुनीता मोरे