Pune News : पुणे : पुणे आणि परिसरात बेकायदा सावकारी वाढत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदा सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश जंगम (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणारा आरोपी सुहास दांडेकर, गोविंद मारुती भोपळे, वर्षा गोविंद भोपळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News ) याबाबत निलेश जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जंगम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत अधिक माहितीनुसार, जंगम यांचे मित्र गोविंद भोपळे या दोघांनी एकत्रितपणे व्यवसाय सुरू करू, असे सांगितले होते. (Pune News ) भोपळे याने जंगम यांच्या नावाने बेकायदा सावकारी करणारा आरोपी दांडेकर याच्याकडून साडेतीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, भोपळे याने व्यवसाय सुरू न करता व्याजाने घेतलेले पैसे खर्च केले.
या दरम्यान, जंगम यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा भोपळे आणि त्याच्या पत्नीने टाळाटाळ केली. दांडेकर याने व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. पतीला शिवीगाळ करुन दमदाटी करण्यात आली.
बेकायदा सावकारीचा त्रास असह्य झाल्याने, अखेर पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. (Pune News ) हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल ठेंबे तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अजित पवार गटाकडून पुण्यात जोरदार मोर्चेबांधणी; विरोधी गटाला रोखण्यासाठी रणनिती तयार!
Pune News : नारायणगाव बायपासजवळ शिवशाही बसला भीषण अपघात; १४ प्रवासी जखमी
Pune News : नागपूर-पुणे विमान उड्डाणासाठी सज्ज होता पायलट… विमानात चढणार, एवढ्यात घडले भयंकर!