Pune News : पुणे : हडपसर येथील एका मद्यपीला कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या समोर गाडीला चावी दिसताच, कोणताही विचार न करता, चक्क स्टार्टर मारून पोलीस व्हॅनच पळविल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.१६) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कुर्डूवाडी पोलिसांनी पाठलाग करून मद्यपीला माढा रस्त्यावरील भोसरे येथून ताब्यात घेतले आहे.
कुर्डूवाडी येथील घटना
हमीद शेख (रा. शिंदेवस्ती, हडपसर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमद रफिक उस्मानबाशा शेख यांनी पोलिसांची व्हॅन (एम. एच.१३/ बी. क्यू. ०१५९) पोलिस ठाण्याच्या समोर रविवारी (ता.१६) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास लावली होती. (Pune News) पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे हे तपासकामी बाहेर जाणार होते.
त्यामुळे शेख हे वाहन घेवून पोलिस ठाण्यासमोर थांबले होते. पण पोलिस उपनिरीक्षक नाळे हे पोलिस ठाण्यातून बराच वेळ बाहेर आले नव्हते. म्हणून चालक शेख गाडीला चावी तशीच ठेऊन नाळे यांना बोलावण्याकरिता ठाणे अंमलदार कक्षासमोर जाऊन थांबले.
दारूच्या नशेत आलेला आरोपी हमीद शेख याने स्टार्टर मारुन पोलिस व्हॅन माढा रस्त्यावरुन भरधाव पुढे घेवून जाऊ लागला होता. अनोळखी व्यक्ती गाडी घेवून जात असल्याचे पाहून चालक शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना सोबत घेऊन दुस-या पोलीस व्हॅनमधून पाठलाग सुरू केला.
दारूच्या नशेत आरोपी हमीद शेख याने दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर भोसरे जवळील लिंबाच्या बागेमध्ये खड्ड्यात नेऊन वाहन उलटवले. (Pune News) पोलिसांनी हमीद शेख याला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. तर बागेमध्ये उलटलेली व्हॅन क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
दरम्यान, लिंबाच्या बागेमध्ये गाडी उलटल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. काहींनी व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी त्यांना झापत छायाचित्रण करण्यास मज्जाव केला. (Pune News) तर साध्या गणवेशातील काही पोलिसांनी गर्दीतील तरूणांचे मोबाईल देखील जप्त केले असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कारचालकाने व्हॉर्न वाजविला म्हणून फटाके फोडनार्याने केला चाकू हल्ला ; आरोपी अटकेत
Pune News : लग्नास विरोध केल्याने घरात घुसून मायलेकींवर कुर्हाडीने वार ; कात्रज येथील घटना