Pune News : : पुणे : कारला झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेणार्या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पहाटे सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याला सहाय्य करणार्या अन्य दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A constable who took a bribe of 13,000 early in the morning was shackled by the bribery department; A case has been registered against two other constables)
येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात झाली कारवाई
पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune News) पोलीस हवालदार जयराम सावलकर आणि पोलीस हवालदार विनायक मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तिघा पोलीस हवालदारांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. (Pune News) त्यानंतर सोमवारी त्याची पडताळणी केली. त्यात त्यांनी तडजोड करुन १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत पोलीस नजर ठेवून होते.
पोलिसांनी तक्रारदार याची तक्रार मध्यरात्रीनंतर दाखल करुन घेतली. (Pune News) त्यानंतर हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. तसा इशारा तक्रारदाराने केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीक्षित याला ताब्यात घेतले.
कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महिला आत्मनिर्भरता प्रबोधनासाठी देशभर काम करणार : साध्वी जगदीश्वरी..
Pune News : धक्कादायक! पब्जी गेम खेळता-खेळता तिच्याशी केली ओळख; नंतर वेळोवेळी केला बलात्कार