Pune news : पुणे : भारतमुक्ती मोर्चाकडून शिवाजी रस्त्यावरुन फेरी काढण्यात आली होती. या फेरीत सहभागी झालेले बनसोडे, शिंगे यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी शिवराळ भाषेत नारेबाजी केली होती. याप्रकरणी भारतमुक्ती मोर्चाच्या अध्यक्षांसह १५० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
भारतमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह रोहित मल्लाप्पा उर्फ मल्लू शिंगे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune news) भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे कसबा विधानसभेचे अध्यक्ष अमित कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भारतमुक्ती मोर्चाकडून काढलेल्या फेरीत हे सर्वजण सहभागी झाले होते. ध्वनिवर्धकावरुन काढलेल्या या फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (Pune news) पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.
दरम्यान, पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये कलम १४३, १४९ अंतर्गत फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Pune news) शिव्या देणारे लोक बामसेफ संघटनेचे असल्याचा आरोप करत भाजपने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता ग्रामीण भागांतही धावणार लाइट मेट्रो?; वाहतूक कोंडींतून मुक्ती मिळणार!
Pune News : आम्ही घरातून काम करण्याची संधी देतो… म्हणत शिकवणी चालक महिलेची पाच लाखांची फसवणूक!
Pune News : संतापजनक! जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी; मुलावर गुन्हा दाखल!