Pune News : पुणे (खेड) : न्यायालयाने निर्णय दिल्याने बैलगाडा शर्यतीचा कायदेशीर मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे आता गावोगावी शर्यतींचे आयोजन होऊ लागले आहे. सद्या गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र असे असताना एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे. (A boy was run over by a mare in a bullock cart race)
मुलाचा जीव थोडक्यात बचावला
खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पण बैलगाडा धावत असताना मार्गात आलेल्या एका मुलाला एका घोडीने तुडवले, तर बैलाने त्याच्यावरून उडी मारल्याने तो मुलगा थोडक्यात बचावला आहे. (Pune News) या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक जणांच्या काळजाचा ठोका चुकल्याेचं पाहायला मिळा.
खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतून बैलगाडा शौकीन आले होते. मात्र, बैलगाडा शर्यत सुरू असताना समोरून बैलगाडा येत होता.(Pune News) त्या बैलगाड्यांच्या पुढे एक घोडी देखील होती. त्यात एका घोडीवर एक व्यक्ती देखील बसलेला होता.
आपल्या दिशेने हे घोडे आणि बैलगाडा येताना दिसले तेव्हा सर्वांनी बाजूला पळ काढला. मात्र, एक मुलगा त्या घोडीच्या समोर आल्याने ती घोडी त्या मुलाला धडकली त्यामुळे घोडी आणि घोडीवर बसलेला व्यक्ती आणि तो मुलगा खाली पडला.(Pune News) मात्र, त्या घोडी पाठोपाठ बैलगाडा येत होता. बैलाने त्या मुलाच्या अंगावरून उडी मारून तो पुढे गेला. त्यामुळे त्या मुलाचा जीव थोडक्यात बचावला.गंभीर जखमी झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात जिना बांधण्यावरून झालेल्या वादातून 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या
Pune News : व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून हळद उत्पादनाचे आमिष दाखवत शेतकऱ्यांची फसवणूक
Pune News : मुलाच्या लग्नपत्रिका वाटताना वरपिता सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे निधन