Pune News : पुणे : कर्जाचा हप्ता थकल्याने एका फायनान्स बँकेच्या अधिकार्यासह सात जणांनी दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरात शिरुन, महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फायनान्स बँकेच्या अधिकार्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी भेकराईनगर येथील एका ४८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार पोलिसांनी ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या कॅम्प शाखेचे सुशिल, वहिद पटे, मोहम्मद काशीद रजा, सरल शर्मा, मंगेश अरविंद धामणे, तन्मय जैन, संजी सरहाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ए यु स्मॉल फायनान्स या बँकेकडून फिर्यादीने कर्ज घेतले होते. काही कारणांमुळे त्यांचे कर्जाचे हप्ते थकले होते. यामुळे हप्ते वसुल करण्यासाठी बँकेचे अधिकारी सुशिल याने बँकेच्या इतर अधिकाऱ्यांना फिर्यादीच्या घरी पाठविले. (Pune News) अधिकारी बॅंकेचे नियम आणि अटी डावलून दारुच्या नशेत फिर्यादीच्या घरात पोहोचले. नशेतच फिर्यादीच्या पतीच्या अंगावर धावून गेले. फिर्यादीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पटे याने फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केला. याशिवाय फिर्यादीचे पती व मुलाला शिवीगाळ करुन घर खाली करण्याची धमकी दिली.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बोपदेव घाटातील ट्रिनिटी महाविद्यालयाजवळ गोळीबार? तपास सुरू
Pune News : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; राज्य मंडळाची घोषणा