Pune News : खडकवासला, (पुणे) : वर्षभरापूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून तीन अल्पवयीन आरोपींनी एका ३६ वर्षीय व्यक्तीचा धारधार शास्त्राने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खूनाच्या गुन्ह्याची चोवीस तासांच्या आत हवेली पोलीसांनी उकल केली आहे.(A 36-year-old man was killed by 3 juvenile accused to avenge the murder of his brother)
राहुल चंद्रकांत आटोळे (वय – ३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना वेल्हे येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ११) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन अल्पवयीन आरोपींनी नांदेड फाट्याजवळील कालव्यालगत राहुल आटोळे (Pune News) याचा धारदार शस्त्राने वार करुन खून केला व मृतदेह झुडपात फेकून दिला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती.
खून झालेल्या राहुल आटोळे याचा अगोदर कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नव्हता, त्यामुळे त्याला नेमके कोणी व का मारले हे स्पष्ट होत नव्हते. सदर खुनाचा पोलीस तपास करित असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून महिती मिळाली की, सदरचा खून हा तिघांनी केला असून ते वाल्हे परिसरात लपून बसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता २३ मार्च २०२२ रोजी नांदेड फाट्याजवळ एका भंगाराच्या दुकानात बसलेल्या सराईत गुन्हेगार मारुती ढेबे (वय -२०) याची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. (Pune News) यामध्ये नांदेड फाट्याजवळील गोसावी वस्ती येथील आरोपी होते. मारुती ढेबे याची हत्या झाल्यापासून त्याचा बदला म्हणून लहान भाऊ गोसावी वस्तीतील एकाला तरी संपवायचे असे म्हणत होता.
खून करून व्हिडिओ मित्रांना इन्स्टाग्रामवर पाठवले..
मित्राला मेसेज केला, ‘बघ आपून काय केलंय’..!
दरम्यान, रविवारी रात्री नऊ वाजता राहुल आटोळे याचा खून केल्यानंतर आरोपी मृतदेह झुडपात फेकून निघून गेले. (Pune News) रात्री दीड वाजता पुन्हा घटनास्थळी जाऊन आरोपींनी मृतदेहाचे व्हिडिओ काढले व मित्राला इन्स्टाग्रामवर पाठवले. तसेच खाली मेसेजही केला की,’बघ आपून काय केलंय’. यावरून आरोपींनी जाणीवपूर्वक दहशत पसरविण्यासाठी अत्यंत निर्घृणपणे हा खून केल्याचे तपासात आढळून आले आहे.
तीन आरोपी अल्पवयीन तर एकाचे वय १७ वर्ष ११ महिने आणि २८ दिवस..!
तीनही आरोपी अल्पवयीन असले तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील एका आरोपीचे वय तर १७ वर्ष ११ महिने आणि २८ दिवस आहे, म्हणजेच गुन्हा करण्याच्या दिवशी तो केवळ दोन दिवसांनी अल्पवयीन होता. अत्यंत निर्घृणपणे खून करुनही अल्पवयीन असल्याने कायद्याचा आधार घेऊन सुटता येईल याची पूर्ण जाणीव या आरोपींना आहे. “आरोपींनी खून केल्यानंतर कोणताही पूरावा मागे ठेवला नव्हता त्यामुळे तपासाचे मोठे आव्हान होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महिला आत्मनिर्भरता प्रबोधनासाठी देशभर काम करणार : साध्वी जगदीश्वरी..