Pune News : पुणे : घराच्या सामाईस जिन्यावरून झालेल्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हिंगणे परिसरातून समोर आला आहे. शेजारच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे असे आत्महत्या करण्यापुर्वी तरुणाने चिठ्ठी लिहली व घरात कोणी नसताना दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार १० एप्रिल रोजी घडला. (A 24-year-old man committed suicide due to a dispute over the construction of a staircase in Pune)
शेजाऱ्यांवर गुन्हा दाखल
मनोज मोहन दाभोळकर (वय 24, रा. आनंद विहार, हिंगणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वडील मोहन दाभोळकर (वय ५०) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune News) त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अशोक गोपाळ बांडागळे (वय ५०) आणि कल्पना अशोक बांडागळे (रा. आनंद विहार, हिंगणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बांडागळे व तक्रारदार दाभोळकर हे हिंगणे येथे एकच ठिकाणी रहावयास आहेत. दोघांच्याही घरात ये जा करण्यासाठी सामाईक लोखंडी जिना होता.दरम्यान बांडागळे यांनी तो जिना काढून तेथे सिमेंटचा जिना बांधण्यास सुरुवात केली. (Pune News) याला तक्रारदार यांच्या मुलाने व पत्नीने विरोध दर्शवला. तेव्हा आम्ही जिना तर बांधणारच तुला काय करायचे ते कर असा दम बांडागळे यांनी दिला. याचा मानसिक त्रास करून घेत 24 वर्षीय मनोज याने आत्महत्या केली.
दरम्यान, मनोजने आत्महत्या करण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहीली त्यामध्ये शेजारचे बांडागळे हे बांधकामामुळे आम्हाला त्रास देत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे असा उल्लेख केला. (Pune News) पुढील तपास पोलीस करत आहेत.