Pune News : पुणे : शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. बंदोबस्तासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. यंदा गणेशोत्सवावर पुणे पोलिसांची सर्वत्र नजर राहणार आहे. त्यासाठी ७ हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहरात सुरक्षिततेसाठी स्पेशल फोर्सेस पुण्यामध्ये तैनात असणार आहे.
सुरक्षेसाठी स्पेशल फ़ोर्सही तैनात
गणेशोत्सवादरम्यान देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून वारंवार तपासणी करण्यात येणार आहे. (Pune News) दिवसभर शहरातील विविध भागांवर या पथकाचे लक्ष असणार आहे. शहरात १ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.
उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी ‘सीआरपीएफ’च्या पाच तुकड्या गणेशोत्सवात पुणे शहरात असणार आहेत. साध्या वेशातील पोलिसांच्या तुकड्यांचे लक्ष असणार आहे. (Pune News) क्यूआरटी पथकाचा वापर करण्यात येणार आहे. एक हजार होम गार्ड आणि पोलीस मित्र पुणेकरांच्या सुरक्षेसाठी असणार आहेत, सहायक पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी ही माहिती दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हडपसर परिसरात परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थांची विक्री; दोघांना अटक
Pune News : पुण्यात गावगुंडांची दहशत; अज्ञातांकडून मध्यरात्री ४ रिक्षांची जाळपोळ