Pune News : पुणे : सहकारनगर पोलिसठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात कर्मचा-यांना पोलिस आयुक्तांनी निलंबित केल्यामुळे शहर पोलिसदलात खळबळ माजली आहे. अदखलपात्र गुन्ह्याची वेळीच गांभीर्याने दखल न घेतल्याने या पोलिसठाण्याच्या हद्दीत दंगलसदृष्य प्रकार घडला. याला जबाबदार धरून आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्यासह सहायक निरीक्षक व तपास प्रमुख, उपनिरीक्षक तसेच पोलिस हवालदार, पोलिस शिपाई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जून महिन्यात एकूण ४ अदखलपात्र गुन्ह्यांतील आरोपी, फिर्यादीवर कठोर कारवाई व प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली नाही. (Pune News) इतरांकडून कारवाई करुन घेतली नाही, म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांची तात्काळ नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली होती.
शहरात गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. भरदिवसा कोयत्याने हल्ले होऊ लागले आहेत. तसेच गाड्यांची तोडफोड केली जात आहे. हातात कोयते, तलवारी घेत दहशत पसरवली जात आहे. (Pune News) यामुळे पुणे पोलिसांच्या कार्य़क्षमतेवर सामान्य नागरिकांसह राजकीय क्षेत्रातून चांगलीच चिखलफेक होऊ लागली आहे. यामुळे शहर पोलिस खडबडून जागे झाले असून पोलिस आयुक्तांचा रुद्रावतार बघायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार