Pune News : पुणे : एकावर धारदार शस्त्राने वार करुन त्याच्याकडील 90 हजार रुपये जबरदस्तीने काढून पळून गेलेल्या आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात आली. ही कारवाई येरवडा पोलिसांनी केली.
येरवडा पोलिसांची कारवाई
येरवडा परिसरातील चिमाघाट येथील ब्रिजखाली मुकेश सपकाळ हे त्यांच्या मित्रासह 14 सप्टेंबरला बसले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन खिशातील 90 हजार रुपये काढून घेऊन पळून गेले होते.
याबाबत मुकेश सपकाळ यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलीस अंमलदार राहुल परदेशी, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे हे आरोपींचा शोध घेत होते. (Pune News) आरोपींचा शोध घेत असताना त्यांना दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी येरवडा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी आरोपींना शिताफीने पकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी योगेश दिलीप नवघणे (वय-30 रा. गोकुळनगर, कोंढवा), सलमान फारुख कुरेशी (वय-23 रा. शनी अळी, येरवडा), शिवकुमार संजय शेलार (वय-22 रा. भाडी मंडई, येरवडा),(Pune News) आकाश हनुमंत भंडारी उर्फ दशरथ (वय-23 रा. वडारवस्ती, येरवडा), अनुज सोमनाथ जोगदंड (वय-19 रा. ताडीगुत्ता, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अवघ्या दोन तासांत अटक केली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे,
येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव, जयदिप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत थिकोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळातर्फे बुधवारी अथर्वशीर्ष पठण; पुण्यात मध्य भागात वाहतुकीत बदल
Pune News : व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी
Pune News : येरवड्यात बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल व खिशातील रोकड लंपास; दोघांना अटक