Pune News : सिंहगड : सिंहगड घाट रस्त्यावर ४ ते ५ ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना शनिवारी (ता.१) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने a. मात्र रविवारी या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरड रात्री कोसळल्याने दुर्घटना नाही
यावर्षी पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात पुणे दरवाजाजवळ उंच कड्यावरून दगड कोसळले होते. (Pune News) आता घाट रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सर्वात धोकादायक ठिकाण असलेल्या घाट रस्त्यावरील पहिल्या तीव्र वळणाच्या ठिकाणी मोठी दरड कोसळली असून अर्ध्या रस्त्यावर दगडमातीचा ढीग पडलेला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही.
सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मागील वर्षी दरड कोसळून एका तरुण ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच दरड कोसळल्याने अनेक वेळा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता. (Pune News) या धोकादायक दरडींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर दरड प्रतिबंधक कामासाठी सुमारे दिड कोटींचा निधी वन विभागाने वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. मात्र अद्याप साधे अंदाजपत्रकही मंजूर झालेले नाही.
दरम्यान, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामधील समन्वयाअभावी पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सिंहगडाच्या पायथ्याशी तपासणी नाक्यावरील उपद्रव शुल्क गोळा करण्याचे काम वगळता इतर कोणत्याही कमाकडे वन विभागाचे अधिकारी लक्ष देताना दिसत नाहीत.
वन विभागाचा कारभार ‘रामभरोसे’
मागील वर्षी वन विभागाचे अधिकारी घाट रस्त्यावरील वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी परिणामकारक प्रयत्न करताना दिसत होते. यावर्षी मात्र सर्व काही ‘रामभरोसे’ कारभार सुरू असल्याचे दिसून येत असल्याने पर्यटकांना येत्या काळातही गैरसोय सहन करावी लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पिंपरी-चिंचवड, नगर, सोलापूरसह राज्यात ८ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालये होणार
Pune News : फक्त आरशावरील रेडियम आणि रिबीनवरून पोलीस हवालदाराने ‘असा’ घेतला आरोपीचा शोध