Pune News : पुणे : अर्धवेळ नोकरी (Part time job ) देण्याचे आमिष दाखवून ९ जणांना ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून २५ लाख ६५ हजारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे. सदर प्रकार १७ जानेवारी २०२३ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी खराडी येथील ३६ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून पार्ट टाईम जॉब असल्याचे सांगितले. (Pune News) पार्ट टाईम जॉब करता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक करण्यास सांगितले.
त्यानंतर वेगवेगळे ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे सांगून टेलिग्राम आयडी देऊन त्यांना जॉईन होण्यास सांगितले.
दरम्यान, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून
फिर्यादी यांच्यासह इतर ८ जणांकडून २५ लाख ६५ हजार २०४ रुपये उकळले. काही कालावधीनंतर परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
त्यानुसार, मोबाईल क्रमांक धारक, टेलीग्राम आयडी धारक यांच्यावर आयपीसी 409, 419, 420, 34, आयटी अॅक्ट 66 (सी), 66(डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर 8 जणांची फसवणूक केली असून त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केले आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या ; आरोपी अटकेत, खराडी परिसरातील घटना.