Pune News पुणे : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या वक्त्यव्यांवरून समाजात अनेक प्रतिक्रिया देखील उमटतात. (Pune News) आता संभाजी भिडे यांनी तिरंगा आणि भगवा ध्वज आणि स्वातंत्र्यदिन यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती. असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. (Pune News)
दिघी येथे संभाजी भिडे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन
पुण्यातील दिघी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने संभाजी भिडे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
संभाजी भिडे म्हणाले की, ’15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं.. वंदे मातरमत म्हटलं ते व्यर्थ नाही. आता ठाम निर्धार करायचा. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य, हे हांडगं स्वातंत्र्य असेल ते पत्करलं पाहिजे. यावर्षीपासून ९ च्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा. तिरंगाही घ्यावा छोटासा. दखलपात्र म्हणून.’
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे कार्य चालते. त्यांच्या विधानांवरून आतापर्यंत खूप वेळा वाद देखील निर्माण झालेले आहेत.