Pune News : पुणे : महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयातील १५ पैकी १३ डायलिसिस यंत्रे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपचारासाठी येणारे रुग्णांना वाऱ्यावर सोडली आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्र चालविणाऱ्या संस्थेला नोटीस
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यात ही माहिती समोर आली आहे. यावरुन केंद्र चालविणाऱ्या संस्थेला नोटीस बजाविण्यात आली असून खुलासा मागविण्यात आला आहे.
शहरातील गरीब रुग्णांना माफक दरात डायलेसिसची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात केंद्र सुरू करण्यात आले आहे. (Pune News) सेंटर लायन्स क्लब ऑफ पुना या चॅरिटेबल संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहे. या संस्थेकडून काही दिवसांपूर्वी केंद्र दीड दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे रुग्णांच्या नातेवाईकांकडून तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कमला नेहरू रुग्णालयाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी केंद्रामध्ये काही अनियमितताही असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
संबंधित संस्थेबरोबर २०१६ मध्ये पाच वर्षांसाठी करार करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पाच वर्षांची मुदतवाढ या संस्थेला देण्यात आली होती. (Pune News) सद्यस्थितीत रुग्णालयातील १५ पैकी १३ डायलेसिस यंत्रे बंद आहेत. केंद्रामध्ये परिचारिकाही पुरेशा प्रमाणात कार्यरत नसल्याचे दिसून आले. तसेच वैद्यकीय कचऱ्याचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित संस्थेला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा ; आरटीओच्या कामाला येणार गती
Pune News : पत्रकार गोळीबार प्रकरणी बंगळुरुमधून शॉपशुटर श्रेयश मतेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या