Pune News : पुणे : घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक वाढली. कांदा, टोमॅटो, काकडी, कारली, वांगी, ढोबळी मिरची, घेवड्यासह सर्व फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढल्याचे चित्र आहे.
पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (ता. २७) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ते ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. (Pune News ) फळभाज्यांची आवक वाढली असून, बहुतांश फळभाज्यांच्या दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कर्नाटकमधून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा, गुजरातमधून १ टेम्पो भुईमूग शेंग, इंदूरमधून ६ ते ७ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ ते १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली, (Pune News ) अशी माहिती घाऊक बाजारातील अडत्यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो नऊ ते दहा हजार पेटी, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ७ ते ८ टेम्पो, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग, १०० ते १२५ गोणी, ढोबळी मिरची १४ ते १५ टेम्पो, काकडी १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पाे, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चांगल्या परताव्याच्या आमिषाने आयटीतील महिलेसह ८ जणांची फसवणूक; गुन्हा दाखल