Pune News : पुणे : जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून परतताना ‘ब्रेन डेड’झालेले पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार स्वप्नील गरड (वय-३७) यांचे निधन झाले आहे. काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गरड यांनी आज बुधवारी (ता.७) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पुणे शहर पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी पुण्यातील ६ गिर्यारोहक गेले होते. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस अंमलदार स्वप्नील गरड, भगवान चोले, अभिषेक गायकवाड, सुविधा कडलग व लहू उघडे यांचा समावेश होता. (Pune News)
या मोहिमेंतर्गत शिवाजी ननावरे, स्वप्नील गरड, लहू उघडे आणि सुविधा कडलग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
काठमांडू येथील रुग्णालयात सुरू होते उपचार
पोलीस अंमलदार स्वप्नील गरड हे शिखर सर करून परत माघारी परतत असताना त्यांना हिमदंशाचा त्रास होऊ लागला. गरड यांची अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड झाले होते. (Pune News) त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज बुधवारी (ता.७) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास संपली. त्यांच्या पश्चात आई, बायको, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखर सर केले आहेत. (Pune News) स्वप्नील गरड यांनी मागील वर्षी जगातील सार्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम हे शिखर सर केले होते. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Pune News : धक्कादायक! घोरपडीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल