Pune News : पुणे : पुणे विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम पूर्णत्वास आल्यामुळे २४ तास विमान वाहतूक करणे शक्य झाले आहे. सहाजिकच विमानांच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. विमानतळावरुन अनेक प्रकारच्या सुविधा सुरु झाल्या असून, शहरातून अनेक नवीन शहरांत विमानसेवा देखील सुरु झाल्या आहेत. सध्या ११ नवीन विमान फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच रिक्त असलेल्या स्लॉटमध्येही लवकरच विमानसेवा सुरु होणार आहेत. येत्या २६ जुलैपासून ही सुविधा सुरु होणार आहे. प्रवाशांसाठी आनंदाची बाब म्हणजे यासाठी प्रथमच बिझनेस क्लासचे तिकीट मिळणार आहे.
११ नवीन फ्लाईट सुरु!
पुणे शहरातून देशातील विविध शहरांमध्ये विमानसेवा सुरु असते. त्याची संख्या ८९ ते ९२ आहे. दररोज सुमारे १७८ ते १८४ विमानांचे आगमन आणि प्रस्थान होते. मागील वर्षी फेस्टीवल सिजनमध्ये ही संख्या २०० झाली होती. पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत वाढ होत असल्यामुळे सुविधांची संख्याही वाढवली जात आहे. (Pune News) यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. यामुळे ५ लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळावर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल बांधले गेले आहे. यामुळे आता पुणे शहरातून दरवर्षी १ कोटीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकणार आहेत.
पुणे हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे शहर आहे. तसेच बंगळुरु आणि हैदराबाद हे देखील माहिती अन् तंत्रज्ञानाची शहरे आहेत. ही शहरे पुण्यावरुन हवाई मार्गाने जोडली जाणार आहेत. (Pune News) स्टार एअर या कंपनीकडून ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. येत्या २६ जुलैपासून ही सुविधा सुरु होणार आहे. स्टार एअर ही कंपनी बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे असे विमान सुरु करणार आहे. शनिवार, रविवार वगळता ही सेवा नियमित असणार आहे.
दरम्यान, पुणे शहर शैक्षणिक अन् औद्योगिक शहर आहे. या शहरात देशभरातूनच नव्हे तर विदेशातून लोक येत असतात. शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. (Pune News) त्याचवेळी रोजगारासाठी पुणे शहरत अनेक जण आले आहेत. पुणे आयटी सिटी झाल्यामुळे संगणक क्षेत्रात काम करणारे देशभरातून पुण्यात येतात. या सर्वांना याचा फायदा होणार आहे.
याबाबत बोलताना स्टार एअरचे सीईओ सिमरन सिंग तैवान यांनी सांगितले की, बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे येथे ही सेवा प्रथमच सुरु करत आहोत. यामुळे प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. पुणे हे आमच्यासाठी चांगले नेटवर्क आहे. त्याठिकाणी भविष्यात आणखी सेवा आम्ही सुरु करणार आहोत.
दरम्यान, पुण्यावरुन प्रथमच बिझनेस क्लास सुविधा स्टार एअर कंपनी देणार आहे. त्यासाठी कंपनी त्याचे लक्झरीयस एम्ब्रेर E175 हे विमान वापरणार आहे. पुणे शहरातून संध्याकाळी ६.४५ वाजता हे विमान निघणार असून हैदराबादला ८.१० वाजता पोहचणार आहे. तसेच हैदराबादवरुन ५.५ वाजता विमान निघणार असून, ६.१५ वाजता पुणे शहरात पोहचणार आहे.
नवी दिल्ली, नागपूर, जोधपूर, अहमदाबात, बेंगळूर या शहरांमध्ये पुणे येथून विमाने सुरु करण्यात आली. जून महिन्यापासून या सेवा सुरु झाल्या होत्या. (Pune News) त्यानंतर गो फस्टने नवी दिल्ली, बेंगळुरु, नागपूरसाठी सात विमानफेऱ्या सुरु केल्या होत्या. जुलै महिन्यात राजकोट, वडोदरा या शहरांतही विमानसेवा सुरु झाली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एनडीए बॉंबने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून बेड्या