Pune News : पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक आणि पर्यटन, ऐतिहासिक स्थळांना भेट देणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच. पुणे शहराचे वैभव पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक, पर्यटक येत असतात. तसेच येथील प्रसिध्द स्थळांना भेटी देतात. यासोबत आता पर्यटकांना आणि शहरातील नागरिकांनी शहरनजीकच्या धार्मिक स्थळांना भेट देणे अधिक सुलभ झाले आहे.
पीएमपीची खास योजना
पीएमपीने शहरातील सात मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गांवर वातानुकुलित गाडीद्वारे प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सेवा दिली जात आहे. (Pune News) पीएमपीच्या पुणे स्थानक-रांजणगाव या पर्यटन बससेवेला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २४ पर्यटकांनी सफर केली. या सेवेसाठी प्रतिप्रवासी पाचशे रुपये एवढा दर असून, प्रत्येक शनिवार आणि रविवार, तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी ही सेवा सुरू राहणार आहे.
पुणे रेल्वे स्थानक, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजीमहाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती असा या पर्यटन सेवेचा मार्ग आहे. पुणे रेल्वेस्थानक येथून सकाळी नऊला बस सुटणार असून, पुणे स्थानक येथे सायंकाळी साडेपाचला पोहोचणार आहे. (Pune News) या पर्यटन सेवेसाठी डेक्कन जिमखाना, पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, महापालिका भवन या पीएमपीच्या पास केंद्रांवर बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, या पर्यटन सेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील उरुळी देवाची येथील गोदाम खाक
Pune News : इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! महिलेवर पुण्यात बलात्कार
Pune News : मोठी बातमी! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे