राजेंद्रकुमार शेळके
Pune News | पुणे : संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट येथे सिनियर केजीच्या मुलांसाठी ”ग्रॅज्युएशन डे” उत्साहात साजरा झाला.सारिका अमोघे ,स्वप्नाली पवळे, कोमल नांदे शितल गवाले, रेखा निकटे, शामल शेलार, स्वाती कलकोटे, मनीषा गोळे, वर्षा भोसले, वनिता राऊत , सुप्रिया वरुते या ब्युटिशियन तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन डे निमित्त कॅटवॉक, एक्टिंग ड्रामा, भाषणे अशा विविध कार्यक्रम झाले. “अच्छा चलता हु दुवा मे याद रखना “याने सर्वांचेच लक्ष वेधले. सर्वच भावुक झाले.
आयुष्याची पहिली पायरी पार करून यशस्वीपणे वाटचालीसाठी शुभेच्छा…
मिनी केजी, ज्युनिअर केजी व सीनियर केजी अशी तीन वर्षाची परीक्षा पूर्ण करून मुले ग्रज्युएट झाली. त्यांचा आनंद व आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच आयुष्याची पहिली पायरी पार करून यशस्वीपणे वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असे शाळेच्या डायरेक्टर आणि मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांनी सांगितले.
तसेच पालकांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी व पालक यांच्यासाठी शिक्षक प्रतिनिधी म्हणून सुमिना ठाकूर यांनी भाषण केले.यावेळी पिरंगुट, उरावडे ,भुगाव, बोतरवाडी या परिसरात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या स्वतःचे ब्युटी पार्लर असणाऱ्या उद्योजकांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान करण्यात आला.
सुंदर राहायला, सुंदर दिसायला सर्वांनाच आवडते व ते महत्त्वाचे काम आजच्या युगात आपल्या या ब्युटिशियन्स करत असतात. इनर ब्युटी ,आऊटर ब्युटी ,महिलांना असणाऱ्या विविध समस्या, ब्युटी टिप्स असे चर्चासत्र यावेळी रंगले.
महिलांना आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कशी स्वच्छता ठेवावी. तसेच आहारामध्ये काय खाल्ले पाहिजे, याविषयी वैशाली सणस यांनी मार्गदर्शन केले.मीनाक्षी जाधव यांनी महिलांना इनर आणि आऊटर ब्यूटी विषयी मार्गदर्शन केले. सर्वच ब्युटीशियनने पालकांना सौंदर्याबद्दल असणाऱ्या महत्त्वाच्या ब्युटी टिप्स सांगितल्या.
सूत्रसंचालन लता मुगावणे यांनी केले. शोभा गोळे यांनी आभार व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी पकडले
Pune : पुण्यात बैलगाडा शर्यतीला गालबोट ; घड्याळाची वेळ चुकली अन् तुफान दगडफेक