पुणे : पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक विशेष सहा गाड्या, तर पुणे-सावंतवाडीसाठी आठ गाड्या सोडण्यात येणार आहेत. नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक (ट्रेन क्र. ०१२०९) स्पेशल २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शनिवारी नागपूरहून रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत.
पुणे-नागपूर सुपरफास्ट साप्ताहिक (गाडी क्र. ०१२१०) स्पेशल २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दर रविवारी पुण्याहून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचणार आहे. या गाडीला उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.