–अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : नागरगाव (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याला ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो, असे म्हणून तब्बल नऊ लाख रुपयांना गंडा घालत फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत शिवाजी रामभाई खळदकर (वय 65 रा. नागरगाव ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी संतोष दादाभाऊ लव्हगळे (रा. ब्रम्हगाव ता. पैठण जि. संभाजीनगर) याच्या विरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागरगाव (ता. शिरुर) येथील शिवाजी खळदकर यांचा कारखान्यांना ऊस तोड मजूर पुरवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणहून ऊस तोड कामगार आणतात. त्यांच्या व्यवसायातून त्यांची संतोष लव्हगळे याच्याशी ओळख झाली. शिवाजी हे त्यांच्या ट्रक्टरचालकासह वडगाव रासाई येथे गेलेले असताना संतोष लव्हगळे याने मी तुम्हाला ऊसतोड कामगार देतो, असे सांगत कामगारांना अॅडव्हान्स देण्यासाठी काही रक्कम घेतली. त्यांनतर संभाजीनगर गावाहून कामगार आणतो, असे म्हणून संतोष गावी गेला. त्यांनतर पुन्हा पैशांची वेळोवेळी मागणी करत रोख व ऑनलाईन असे नऊ लाख रुपये घेतले.
परंतु कामगार येत नसल्याने खळदकर यांनी संतोषशी संपर्क केला. मात्र मोबाईल बंद असल्याने खळदकर संभाजीनगर येथे गेले असता संतोषने गावातून कामगार गोळा करतो असे सांगत निघून गेला. त्यांनतर पुन्हा आलाच नसल्याने खळदकर घरी आले. त्यांनतर पुन्हा संतोषशी संपर्क झाल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याची फिर्याद त्याने दिली.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहेत.