पुणे : पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून एकाच दिवशी ८ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे.
या वर्षी परिमंडळ ५ मधील ५३ गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये हडपसर पोलीस ठाण्यातील १, मुंढवा पोलीस ठाण्यातील ४, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील २, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील १ अशा ८ गुन्हेगारांचा समावेश आहे.
मुंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हेगार :
आनंद चिंतामणी गायकवाड (वय-५३, रा. आनंद निवास, कामगार मैदान, मुंढवा) २ वर्षे तडीपार, शांताबाई यल्लप्पा कट्टीमणी (वय-५२, रा. बालाजीनगर, घोरपडीगाव) १ वर्षे तडीपार, अतिश सुरज बाटुंगे/ तामचिकर (वय-२५, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) २ वर्षे तडीपार, बापू अशोक जाधव (वय-४७, रा. साडेसतरानळी रोड, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) ६ महिने तडीपार करण्यात आले आहेत.
बिबवेवाडी पोलीस ठाणे :
विजय सिद्धप्पा कटीमणी (रा. झांबरेवस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) २ वर्षे तडीपार, कन्या अभिमन्यु राठोड (वय-३५, रा. गव्हाणेवस्ती, गंगाधाम रोड, बिबवेवाडी) १ वर्षे तडीपार करण्यात आले आहेत.
मार्केटयार्ड पोलीस ठाणे :
दिलेर अन्वर खान (वय-३४, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) १ वर्षे तडीपार करण्यात आला आहे.
हडपसर पोलीस ठाणे :
रवी मारुती चक्के (वय-३०, रा. साडेसतरानळी, दांगट वस्ती, हडपसर) २ वर्षे तडीपार करण्यात आला आहे. हे गुन्हेगार तडीपार कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यामध्ये दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त आर राजा यांनी केले आहे.