पुणे : महापालिका कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 23 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची रक्कम बॅंक खात्यात जमा होणार आहे. जवळपास 18 हजार कर्मचा-यांना बोनस मिळणार आहे. त्यामुळे आता कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. यासंदर्भात वित्त व लेखा विभागाने परिपत्रक काढले आहे.
2023-24 च्या मुळ वेतन, महागाई भत्ता यावर 8.33 टक्के आणि 23 हजार रुपये सानुग्रह अनुदान उपस्थितीच्या प्रमाणात दिले जाणार आहे. गेल्या वर्षभरात संबंधित सेवकांची प्रत्यक्ष हजेरी किमान 180 दिवस असणे आवश्यक आहे, अशांनी ही रक्कम दिली जाणार आहे.
दरवर्षी दिवाळी निमित्ताने पुणे महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदार आणि बोनस देण्यात येतो. यासाठी अर्थ संकल्पात सुमारे 125 कोटींची तरतूद करण्यात आली होती. लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये 18 ऑक्टोबरपर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले असून दिवाळीपूर्वी ही रक्कम कर्मचा-यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.