पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहतूक नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई तर होतेच, मात्र, आता त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे होणार आहे. महामार्गावर रस्ते विकास महामंडळाकडून ९४ कि.मी. अंतरात रस्त्यावर आयटीएमएस सिस्टीम (इंटेलिनंट ट्रॅफिकं मॅनेजमेंट) बसविण्याचे सुरू असलेले काम जवळपास पूर्ण झाले असून कारवाई करण्यासाठी या सिस्टीमचा वापर होणार आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाणार असल्याने यातून अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. वण्याचे काम गेल्या सहा महिन्ऱ्यांपूर्वी हाती घेतले होते. ते सध्या पूर्ण झाले असून ही पद्धत नुकतीच सुरू केली आहे. आयटीएमएस म्हणजे इंटेलिजंट द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेत रस्ते विकास महामंडळाने ९४ कि. मी. अंतरात आयटीएमएस सिस्टिम बसवण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले होते. हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे दंड आकारणी होत आहे. चालकांना किमान ५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागत आहे. अनेकवेळा बोरघाटात रस्ता मोकळा असल्याने वेग मर्यादा मोडीत वाहनचालक सुसाट सुटतात. अशी वाहनांची या सिस्टिममध्ये नोंद होते त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर कारवाई करीत आहे.