पुणे : पुणे : पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या मार्गावरील सांगली ते मिरज टप्प्यातील कामाची केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी तपासणी केली. या तपासणीनंतर या मार्गावर रेल्वे गाड्या चालविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग आता वाढणार आहे.
मिरज यार्ड येथे ९८ तास नॉन इंटरलॉकिंगचे (७२ तास रहदारी आणि २६ तास ट्रॅफिक ब्लॉक) काम करण्यात आले. सांगली-मिरज (९.४८ किमी) दुहेरीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. नॉन इंटरलॉकिंगच्या कामादरम्यान एबीबी मेकच्या २४४ मार्गाच्या विद्यमान मिरज रुट रिलेइंग इंटरलॉकिंगमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. तसेच मध्य रेल्वेवर प्रथमच नॉन इंटरलॉकिंगच्या कालावधीत फ्री होम आणि ब्लॉक संरक्षणासह अॅडव्हान्स स्टार्टर सिग्नल बसवण्यात आला आहे.
या रुट रिलेइंग इंटरलॉकिंगमध्ये ३ मोठे फेरफार आधीच केले गेले होते. ज्यामुळे सर्किटमधील फेरफार मोठ्या जंपरिंग/शीटमध्ये गुंतल्याने गुंतागुंत निर्माण झाली होती. ते प्रथम दुरुस्त करण्यात आले. सिग्नलिंग आणि दूरसंचार विभागाचे रेल्वे कर्मचारी, तसेच कंत्राटदार कर्मचाऱ्यांसह मिळून २५० हून अधिक कर्मचारी या कामात सहभागी झाले होते. या कमिशनिंगमध्ये पुणे-मिरज दुहेरीकरणातील सर्वांत मोठे यार्ड रिमॉडेलिंगचे कार्य करण्यात आले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्या मार्गदर्शनात हे काम करण्यात आले आहे.