पुणे : सध्या देशभरात दिवाळीच्या सणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अशातच शुक्रवारी (ता. 01 नोव्हेंबर) लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. यादिवशी मेट्रो सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंतच धावणार आहे. तर शनिवारपासून मेट्रो नियोजित वेळेनुसार सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धावेल. पुणे मेट्रो व्यवस्थापनाने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे.
कृपया लक्ष द्या !! पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना, शुक्रवार, दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सायंकाळी 6:00 ते रात्री 10:00 दरम्यान मेट्रोची सेवा बंद असेल. शनिवार, दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत सुरळीत सुरू असेल. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.” अशी पोस्ट पुणे मेट्रोने केली आहे.
सध्या दिवाळीच्या सणानिमित्त खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यात बसेस, मेट्रो, रेल्वे सर्वत्र नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पण या गर्दीच्या कालावधीतच पुणे मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चार तासांसाठी पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. शनिवारपासून पुणे मेट्रो पुन्हा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत धावणार आहे.
#AttentionPlease
कृपया लक्ष द्या !!पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना
शुक्रवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सायंकाळी ६:०० ते रात्री १०:०० दरम्यान मेट्रोची सेवा बंद… pic.twitter.com/vHHQVWzQbV
— Pune Metro Rail (@metrorailpune) October 30, 2024