पुणे : जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. आता जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. परंतु पुणे मेट्रोचं तिकीट 15 रुपये आहे पण प्रवाशांना पार्किंगसाठी एका तासाला 35 रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे पुण्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे मेट्रोच्या काही मोजक्या स्थानकांवर सध्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत. यातील पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क पार्किंग सुविधा सोमवारपासून (ता.30) सुरू झाली. या ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुप्पट वसुली सुरू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी सुरू केली. यामुळे अखेर महामेट्रोने पहिल्याच दिवशी या ठेकेदाराचे कंत्राट रद्द केले.
ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुचाकीसाठी तासाला 15 रुपये शुल्क आणि मोटारीसाठी तासाला 35 रुपये शुल्क आकारण्यास सुरूवात केली. याबाबतची तक्रार अनेक मेट्रो प्रवाशांनी केली. मेट्रोचा तिकिटाचा किमान दर 10 रुपये आहे. याचवेळी पार्किंग शुल्काचा दर त्यापेक्षा जास्त असल्याचा मुद्दाही प्रवाशांनी यावेळी उपस्थित केला. वाहनतळ शुल्कावरून आरडाओरडा झाल्यानंतर महामेट्रोने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट तात्काळ रद्द केले.
यावेळी पुणेकरांच्या मेट्रोच्या तिकीट दरावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हणले आहे की, मेट्रो पार्किंगची सेवा विनामूल्य असणे आवश्यक आहे. किंवा ते एखाद्या शॉपिंग मॉलसारखे असायला हवे. जिथे तुम्ही मेट्रोचे तिकीट दाखवाल आणि पार्किंग विनामूल्य मिळु शकते.
तर दुसऱ्या युजरने म्हणाले की, या तिकीटावर जीएसटी क्रमांक कुठे दिसतच नाहीयेय? सरकारी कंत्राट मिळविण्यासाठी सर्व पार्किंगच्या ठिकाणी जीएसटी क्रमांक अनिवार्य आहे. तसेच ‘जर एखादा माणूस सकाळी ऑफिसला जातो आणि मेट्रो पार्किंगच्या जागेवर आपली कार पार्क करतो आणि 10 तासांनंतर परत येतो, तर त्याची किंमत किती असेल? लोक मेट्रो तिकिट घेणार नाहीत आणि स्वतःची वाहने वापरतील.
मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार 🤑
आधी मेट्रो प्रशासनाने पार्किंग साठी प्रति तास १५ रुपये भाडे आकारायला सुरुवात केली. नंतर नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट रद्द करत तात्पुरते पार्किंग फुकट केले आहे.
आपल्याला काय वाटते? pic.twitter.com/HOqCLzV0hc— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) October 1, 2024