पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात रविवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत मेट्रो स्थानकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. गेल्या काही दिवसांपूर्वीच 26 सप्टेंबर रोजी या मेट्रोस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं.
मेट्रो स्टेशनमधील तळघरामध्ये वेल्डिंगचे काम सुरु होते. त्यामुळे फोम साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला. जवानांनी अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन पाच ते दहा मिनीटांत आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत मेट्रो स्थानकाचे मोठे नुकसान झाले असले तरी रात्री आग लागल्याने प्रवाशांची वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
या घटनेसंदर्भात खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत म्हणाले, मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालकश्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही !
मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.… pic.twitter.com/KxsEHOqQPo
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2024