पिंपरी : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लोणावळा ते पुणेदरम्यान आता दुपारच्या वेळेतही लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल धावणार आहे. याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डने घेतला आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची सोय होणार आहे. कोरोना काळात पुणे-लोणावळादरम्यान रेल्वेची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना गेला तरी लोकल सुरु केली नाही.
मात्र आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल ट्रेन धावत होत्या. करोना काळात त्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून साडेदहा ते अडीच या वेळेत लोकल सेवा बंद होती. यामुळे प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दड आणि वेळेचा अपव्यय होत होता. आता हा प्रश्न सुटणार असून नागरीकांच नुकसान आणि वेळही वाया जाणार नाही.
या वेळेत धावणार लोकल
- शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी १२.०५ वाजता लोकल सुटेल.
- लोणावळा स्थानकावरून सकाळी ११.२० वाजता लोकल सुटेल.