Pune Loksabha Election | पुणे : भाजपचे नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची चर्चा चांगली रंगली आहे.
पोटनिवडणुक होणार की थेट पंचवार्षिंक निवडणुक होणार यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य केले आहे.”अजूनही (बापटांचे) त्यांचे कुटुंबीय किंवा पक्षावर दुःखाचे सावट आहे. असे असताना पोटनिवडणुकीबाबत कशाला चर्चा करता, मीही कुठलीही चर्चा करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट करत पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत तूर्त कुठलीही चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केले.
आंबी येथे शिरे शेटेवाडी पुनर्वसन प्लॉट वाटपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय भेगडे होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
या वेळी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, राजाराम शिंदे, गुलाबराव म्हाळसकरआदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग ; तरूणाने नग्न होत केले असे काही