पुणे : मागील आर्थिक वर्षात पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रु.२/- दरफरक अदा करणेचे ठरवलेले होते. या दरफरकाची रक्कम दोन टप्प्यांमध्ये देण्यात येत आहे. त्यातील पाहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यास सुरूवात करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रति लिटर रु.१/- प्रमाणे एकूण रक्कम रु. ६ कोटी ४३ लाख इतकी रकम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. याचा लाभ ८५५ दूध संस्थांना व त्यामार्फत हजारो शेतकऱ्यांना मिळाला.
दुसरा टप्प्यामध्ये मार्च २०२५ मधील दूध बीलांमध्ये उर्वरित रु.१/- प्रति लिटर रक्कम जमा करण्यात आली आहे. ६ कोटी ४३ लाख ४६ हजार इतकी रक्कम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. याचा लाभ ८५६ दूध संस्थांना व त्यामार्फत हजारो शेतकऱ्यांना मिळाला आहे.