Pune | पुणे : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या पुणे विभागाच्यावतीने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ अंतर्गत यावर्षी प्रथमच ‘फळ, धान्य व मिलेट महोत्सव-२०२३’चे दामोदर व्हिला, कोथरूड बस स्टँडच्या समोरील पटांगणामध्ये ५ ते ९ एप्रिल २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
सुटीच्या दिवसात या महोत्सवाचे आयोजन…
या महोत्सवाच्या माध्यमातून द्राक्ष, डाळींब, अंजीर, आंबा व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना आपल्या दर्जेदार उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. सुटीच्या दिवसात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे कोथरूडमधील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी व पुणे विभागीय उपसरव्यस्थापक राजेंद्र महाजन यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Bhor News | भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दिवसात सहाजण बेपत्ता ; ४ मुली व २ मुलांचा समावेश..!
Pune News | वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले
Shirur Crime News : निमोणे येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, परिसरात खळबळ..!