खानापूर : कारवार तालुक्यातील हणकोण गावात रविवारी पहाटे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकावर शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
विनायक काशिनाय नाईक (वय-52) असे त्यांचे नाव असून ते मूळचे हाणकोण येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विनायक नाईक आणि वैशाली हे हणकोणचे असून पुणे शहरात राहत होते. पुण्यात त्यांचा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा व्यापार आहे. ते पुण्याहून साथेरी देवीच्या जत्रेसाठी आले होते आणि हणकोण येथील घरी थांबले होते. रविवारी सकाळी ते पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असताना, सकाळी साडेपाचच्या दरम्यान, चार ते पाच अनोळखी मारेक-यांनी मोटारीतून येऊन त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच विनायक नाईक यांची पत्नी वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना कारवार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद सदाशिवगड पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.