Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत विजयाचा आकडा गाठलाच पाहिजे, फडणवीसांनी टोचले नेत्यांचे कान!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 January 2026, 20:02
pune

photo- social media

Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीत शंभरहून अधिक जागा जिंकायचं ‘मिशन 100 प्लस’ घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसमोर आता स्वतःचाच मित्रपक्ष अडसर ठरताना दिसतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी भाजपसाठी मोठं आव्हान बनली असून, त्यामुळे भाजपच्या गोटात चांगलीच धाकधूक आहे.

अजित पवारांनी निवडणुकीत खेळलेली आक्रमक रणनीती, काही ठिकाणी शरद पवार गटाशी जमवलेली पडद्यामागची समीकरणं, आणि त्यातच भाजपमधील काही बंडखोरांना आपल्या गटात घेऊन उमेदवारी देण्याचा डाव – या सगळ्यामुळे अनेक प्रभागांत भाजपची मतं फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपचं ‘मिशन 100 प्लस’ अडचणीत आलं असल्याची चर्चा सुरू आहे.

 

यात भर म्हणजे काही खाजगी आणि शासकीय सर्वेक्षणांमध्ये भाजपची कामगिरी अपेक्षेइतकी दमदार दिसत नाही, असे संकेत मिळाले आहेत. हे अहवाल समोर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघाडणी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काल रात्री कात्रज येथील जाहीर सभेत फडणवीस यांनी अजित पवारांचं नाव न घेता, त्यांच्या जुन्या कार्यपद्धतीवर टोला लगावला. मात्र खरी राजकीय हालचाल सभा संपल्यानंतर पाहायला मिळाली.

सभा आटोपल्यानंतर फडणवीस विमानतळाकडे निघाले असताना खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील एकाच गाडीत होते. त्याच वेळी चंद्रकांत पाटील तिथे पोहोचले. फडणवीसांनी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना बोलवण्याचे आदेश दिले आणि त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या आवाजात “अण्णा… अण्णा…” अशी हाक मारत मोहोळ यांना घाईत बोलावून घेतलं.

यानंतर विमानतळावर या तीन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड दीर्घ चर्चा झाली. या बैठकीत फडणवीसांनी पुण्यातील सर्व 165 प्रभागांचा सविस्तर आढावा घेतला. ज्या ठिकाणी भाजपची स्थिती कमकुवत आहे, किंवा जिथे सर्वेक्षण भाजपविरोधात गेले आहेत, तिथे तात्काळ रणनीती बदलण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

“गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत विजयाचा आकडा गाठलाच पाहिजे,”
अशा कडक शब्दांत फडणवीसांनी स्थानिक नेतृत्वाची चांगलीच शाळा घेतली.

एकंदरीत, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अस्वस्थता वाढली असून, अजित पवारांच्या हालचालींमुळे राजकीय गणितं बदलताना दिसत आहेत. आता पुढचे काही दिवस भाजपसाठी निर्णायक ठरणार, हे मात्र नक्की.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

Saturday, 9 May 2026, 17:32

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

Saturday, 9 May 2026, 17:16
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 9 May 2026, 16:39

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
Next Post
Crime

Crime : नेम चुकला तरी सोडलं नाही! गोळीबार अन् सपासप वार करून हत्या; आरोपी विशाल सूर्यवंशी फरार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.