Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदी युवराज हिरामण काकडे; उपसभापतीपदी अपक्ष विद्या दत्तात्रय गायकवाड बिनविरोध

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 9 March 2026, 12:02

लोणी काळभोर, ता. 9 : पुणे जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी हवेली पंचायत समिती अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे हवेली तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवा रंग चढला असून अपक्षाच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यात यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हवेली पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता. 9) पार पडली. सभापतीपदासाठी युवराज काकडे तर उपसभापतीपदासाठी विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थित सदस्यांनी दोघांचे अभिनंदन केले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, संचालक संतोष कांचन, माजी सरपंच अण्णा महाडिक, नंदू काळभोर, सुरज चौधरी, पंचायत समिती सदस्य मनोज ऊर्फ कृषीराज चौधरी, कोमल कांबळे, सुषमा मुरकुटे, अमोल टेकाळे, युवराज वांजळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, नवीन उपसभापती विद्या गायकवाड यांनी सभागृहातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“हवेली तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम केले जाईल. गावागावातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांवर विशेष भर देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील.”
युवराज काकडे, सभापती (हवेली पंचायत समिती)

अपक्षाच्या पाठिंब्याने सत्तेची गणिते जुळली
हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांचा ‘मॅजिक फिगर’ आवश्यक होता. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी एक जागेची कमतरता राष्ट्रवादीसमोर होती. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या बैठका व राजकीय हालचालींना वेग आला. अखेर अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 7 वर पोहोचले आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राष्ट्रवादीने रणनीती आखत गायकवाड यांना उपसभापतीपदाची संधी देत सत्ता समीकरणे पक्की केली.

आरोग्यदूत ते सभापतीपदी भरारी
युवराज काकडे यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील हिरामण काकडे यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे, तर आई छाया काकडे यांनी थेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले.राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत त्यांनी थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्यपद भूषवले. त्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे कार्य केले. या कामामुळे त्यांची ‘आरोग्यदूत’ अशी ओळख जनमानसात निर्माण झाली.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी मिळवून देण्यासही युवराज काकडे यांनी पुढाकार घेतला. पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवत हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी दिली असून ‘आरोग्यदूत ते सभापती’ असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅट मालकांना मोठा दिलासा! गृहनिर्माण सोसायट्यांची ‘मनमानी’ आता चालणार नाही; ‘समान देखभाल शुल्का’चा न्यायालयाचा आदेश

Monday, 22 June 2026, 20:57

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार…

Monday, 22 June 2026, 20:14

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

Monday, 22 June 2026, 19:32

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04
Next Post

Pune News: वेटिंग रूमचं टेन्शन संपलं! पुण्यात उभारले जाणार आलिशान 'स्लिपिंग पॉड्स'; पाहा एका तासाचे किती पैसे मोजावे लागणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.